2002 ते 2012 या कालावधीतील उन्हाळी सुट्टीतील वेतनाची थकबाकी आणि ऑक्टोबर 2018 ते मार्च 2019 पर्यंतचे थकीत मासिक वेतन आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील मागील तीन महिन्यांचे थकीत मासिक वेतन मंजूर करण्याच्या मागणीसाठी आया कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आया कार्यकर्त्यांचे 2002 ते 2012 या कालावधीतील उन्हाळी सुट्टीतील वेतनाची थकबाकी आणि ऑक्टोबर 2018 ते मार्च 2019 पर्यंतचे थकीत मासिक वेतन आणि मागील तीन महिन्यांचे मासिक वेतन सरकारने दिलेले नाही. ते त्वरित देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर घोषणा देत आंदोलन छेडले. त्यानंतर जिल्हा पंचायत मुख्य सचिवांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा आया महासंघाच्या राज्य सचिव जयश्री आवटी म्हणाल्या, शिक्षण व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी देय वेतन थकीत ठेवण्याच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. मागील तीन महिन्यांपासून सर्व शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळेतील आयांचे उन्हाळी सुट्टीचे वेतन, म्हणजे ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंतचे थकीत वेतन आणि सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन रोखून धरले आहे. जिल्ह्य़ात सुमारे 10 वर्षांपासून वेतन रोखून धरण्यात आले आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारने लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात अथणी, गोकाक, रामदुर्गसह बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आया कर्मचारी उपस्थित होत्या.


Recent Comments