बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी वडगाव येथील श्री बनशंकरी देवीच्या जत्रा महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित गणहोम व चंडिका होममध्ये सहभागी होऊन देवीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या,धार्मिक कार्याचा मानवी वर्तनावर सकारात्मक परिणाम होतो. ज्यांना केवळ आपले नव्हे तर सर्व जगाचे भले व्हावे, असे वाटते त्यांना दैवी शक्ती पुण्य देतात. यावेळी त्यांनी देवी बनशंकरीकडे संपूर्ण देशातील जनतेचे कल्याण करण्याची प्रार्थना केली.
व्यंकटेश होन्नळी, हनुमंत गरडीमनी, उमेश शिरहट्टी, विनय माळगी, रमेश सोनटक्की, परशुराम डांगे, सुरेश कित्तूर, बसप्पा हजेरी, लक्ष्मी कल्लुर, दत्ता बंडीगनी व बनशंकरी जत्रा महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments