Khanapur

खानापूर येथील मलप्रभा नदीत बुडून एकाचा मृत्यू

Share

खानापूर येथील मलप्रभा नदीत आंघोळीस गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, सुनील चंद्रप्पा तळवार (वय 32, रा. अशोकानगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील चंद्रप्पा तळवार आपल्या कुटुंबीयांसह नदीवर आला होता. त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी म्हणून तो पाण्यात उतरताच पाण्याची खोली अधिक असल्याने तो बुडू लागला. पाहता-पाहता कुटुंबियांच्या समोरच तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले व त्यांनी शोधाशोध केली.

परंतु मृतदेह सापडला नाही, खानापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रकाश राठोड हे देखील त्यांच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी आले. त्यात काहीच प्रगती झाली नाही. सुनील त्याच्या कुटुंबियांसमोरच गायब झाला ही दुर्दैवी बाब आहे.

Tags: