Belagavi

व्यासंगी अर्थतज्ज्ञ डॉ. अनिल कालकुंद्रीकर यांचे निधन

Share

बेळगावतील प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल बी. कालकुंद्रीकर यांचे दि. 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

डॉ. कालकुंद्रीकर बेळगावातील केएलएस संस्थेच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचे निवृत्त प्राचार्य होते. तसेच आय. एम. इ .आर. शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अर्थशास्त्रातील जटील विषय आणि अर्थसंकल्पाचे सहजसोपे विश्लेषण ते करत. अर्थविषयक अभ्यासपूर्ण लेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनामुळे बेळगावातील अर्थशास्त्राचा एक व्यासंगी अभ्यासक हरपला आहे.

Tags: