बेळगावात सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र काही फलाटांवर नामफलक आणि वेळापत्रक लावण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची माहिती मिळविण्यासाठी भटकंती सुरू आहे. .

मध्यवर्ती बसस्थानकावर माहिती फलक नसल्यामुळे विविध गावांना जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. चुकीच्या बसेसमधून चढण्याच्या आणि उतरण्याच्या घटना घडत आहेत. केवळ प्लॅटफॉर्म क्र. 1 वरच फक्त धारवाड, चित्रदुर्ग,

हुबळी, बंगळुर, हावेरी चेन्नई, राणेबेन्नूर, तिरुपती, दावणगेरे या ठिकाणांसाठीचे फलक आहेत. उर्वरित फ्लॅटफॉर्मवर माहितीचे फलक लावण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, हे नामफलक त्वरित लावावेत अशी मागणी प्रवाशांनी केएसआरटीसी व्यवस्थापनाला केली आहे.


Recent Comments