सरकारी कोट्यात एमबीबीएसला प्रवेश मिळूनही फी भरण्यासाठी धडपडणाऱ्या दोन गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
बबलेश्वर तालुक्यातील उप्पलदिन्नी गावातील सुरेश जी. हळ्ळी व कंबागी गावातील बाळाप्पा एम. पुजारी यांना एमबीबीएस कोर्सच्या पहिल्या वर्षासाठी कॉलेज आणि हॉस्टेल फीचा चेक एम. बी. पाटील यांच्या वतीने बीएलडीई संस्थेचे संचालक व विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील यांनी वितरण केले. यावेळी एमएलसी सुनीलगौडा पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून गरीब लोकांची सेवा करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे वडील व ग्रामस्थ संस्थेच्या मुख्य कार्यालयात उपस्थित होते व त्यांनी धनादेश स्वीकारून एम. बी. पाटील आणि बीएलडीई संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अधीक्षक एस. ए. बिरादार (कन्नाळ), प्रशासक एम. एन. चोरगस्ती, लेखापाल एस. एस. पाटील उपस्थित होते.


Recent Comments