Belagavi

श्री समादेवी जयंती उत्सवाला प्रारंभ

Share

सालाबाद प्रमाणे , श्री समादेवी जयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून , चार दिवस धार्मिक, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत .

बेळगावमधील समादेवी गल्लीतील श्री समादेवी मंदिरामध्ये समादेवी उत्सवाला प्रारंभ झाला आहे . उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवी दरबारचे उदघाटन प्रमुख पाहुण्या डॉ . अंजली जोशी यांच्या हस्ते पार पडले . महिलांनी मंदिरात येऊन देवीची ओटी भरली .

या उत्सवादरम्यान दररोज भजन , काकड आरती , चौघडा, त्याचप्रमाणे मुलांसाठी वेशभूषा , श्लोक पठण पुरुषांवर भाषण स्पर्धा घेतल्या जाणार आहेत . त्याचप्रमाणे माधव कुंटे यांचे वऱ्हाड निघालाय लंडनला हा तुफान विनोदी एकपात्री कार्यक्रम होणार आहे . शिवाय महाअभिषेक , ओटी भरणे , पुराण वाचन , श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे . या कार्यक्रमाला आ . अनिल बेनके , कर्नाटक देवालय संवर्धन समितीचे राज्य संयोजक मनोहर मठद उपस्थित राहणार आहेत . शेवटच्या दिवशी नवचंडीका होमचे आयोजन करण्यात आले आहे . या होमानंतर , महाप्रसाद होणार आहे .

यावेळी अध्यक्ष दत्ता कणबर्गी , अमित कित्तूरकर , उज्वला बैलूर , लक्ष्मी बडकर , आणि विश्वस्त मोतीचंद्र , दीपक कलघटगी आदी उपस्थित होते .

Tags: