अथणी तालुक्यातील हलियाळ गावात चार विकास कामांचा शुभारंभ कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच अथणी मतदारसंघाचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आला.

अथणी तालुक्यातील हलियाळ गावात 2 कोटी 80 लाख रुपये खर्चाच्या शेडशाळ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, श्री लक्ष्मी मंदिर समुदाय भवनाच्या कामाचे 5 लाख रुपयांचे भूमिपूजन.इंचगेरी मठाच्या कम्युनिटी हॉलचे 5 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन तसेच
गोकाक मुख्य रस्त्यापासून मंगसुळी फार्म हाऊसपर्यंत 57 लाख रु . च्या खर्चातून सी. सी रस्त्याच्या कामाचे पूजन कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच अथणी मतदारसंघाचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले.
विकास कामांना चालना दिल्यानंतर आ . महेश कुमठळ्ळी यांनी याबद्दल माहिती दिली .
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष मुदकण्णा शेगुणशी, शहर नेते कुमार गौडा पाटील, सुरेश वडेद , रावसाहेब पाटील, दीपक मुरगुंडी, विठ्ठल मुरगुंडी, सिद्धप्पा लोकुर, रमेश गुमाची, आण्णाप्पा बागी, मंतेश इंगळी, संतोष कांबळे , राहुल मादार आदी उपस्थित होते.


Recent Comments