केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यातील अप्पर भद्रा बॅंकमेंट प्रकल्पासाठी 5300 कोटी रु. निधी जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे आनंद झाला, या निर्णयाचं मी स्वागत करतो असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बंगळुरहून आज ब्याडगी तालुक्यातील शिदेनूर गावात आल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कर्नाटकातील प्रमुख सिंचन प्रकल्प. मध्य कर्नाटकातील एक लाख हेक्टरपेक्षा जास्त दुष्काळी भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो खूप फायदेशीर ठरणार आहे. याला राष्ट्रीय प्रकल्प करण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वी पाठवला होता. यासाठी 5300 कोटी रुपये दिले आहेत हे स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले. कर्नाटकातील अनेक प्रकल्पांपैकी ही पहिली राष्ट्रीय योजना आहे. या प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जाहीर झाला ही आनंदाची बाब आहे असे बोम्मई म्हणाले.
ब्याडगी इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांच्या विरोधावर भाष्य करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सुपीक जमीन उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जिथे सुपीक जमीन आहे ती सोडून, नापीक जमीन घेऊन इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळेच आम्ही ब्याडगी इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादन प्रक्रिया आदेश मागे घेतला आहे. हावेरी जिल्ह्य़ात अन्यत्र कुठे कॉरिडॉर व्हावा, अशा जागा शोधण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर, अप्पर भद्रा प्रकल्पाला मोठा निधी देण्याच्या घोषणेचे मुख्यमंत्री बोम्मई यांनीआनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments