Belagavi

केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक, : आ. हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य हट्टीहोळी यांचे मत

Share

केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ निवडणुकीच्या उद्देशाने मांडला जाणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले .

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना ते म्हणाले की, महागाई नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात कोणतीही उपाययोजना नाही. ते म्हणाले की, युवक समाज आणि बेरोजगार युवकांसाठी अर्थसंकल्पात कोणत्याही आशादायी योजना नाहीत.

भ्रद्रा अप्पर बँक प्रकल्पासाठी 5,300 कोटींच्या घोषणेव्यतिरिक्त, राज्यासाठी अशी कोणतीही महत्त्वाची घोषणा किंवा अनुदान दिलेले नाही. कर्नाटकाबाबत केंद्राची धारणा अर्थसंकल्पात दिसून येते. हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले

Tags: