Belagavi

बेनकनहळ्ळी गावात ३२ वर्षानंतर होणार महालक्ष्मी यात्रा

Share

बेनकनहळ्ळी गावामध्ये 2024 मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने आज गावामध्ये रेडा आणि पालवा सोडण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या सदस्यांनी दिली .

2024 सालात होणाऱ्या यात्रा महोत्सवानिमित्त माहिती देताना त्यांनी सांगितले कि , बेनकनहळ्ळी गावामध्ये 2024 मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने आज गावामध्ये रेडा आणि पालवा सोडण्यात आला . ही यात्रा याआधी 1990 -91 च्या दरम्यान झाली होती . आता तब्बल 32 वर्षांनंतर ही यात्रा होणार आहे . या यात्रेनिमित्त , सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रेडा आणि पालवा सोडण्याचा कार्यक्रम पार पडला .

यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीत आणि वाजतगाजत रेडा आणि पालव्याची मिरवणूक बेनकनहळ्ळी गावामध्ये तसेच ,गणेशपुर ,ज्योतिनगर, क्रांति नगर,हिंदू नगर परिसरात काढण्यात आली .
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली ही मिरवणूक बघण्यासारखी होती .

यावेळी बेनकनहळ्ळी , ,गणेशपुर ज्योतीनगर ,क्रांतीनगर मधील नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते

Tags: