Belagavi

राजकीय दबावाखाली श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे : रमाकांत कोंडुसकर यांचा आरोप

Share

श्रीराम सेना हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करून ,त्यांना राऊडीशीटर ठरवून त्यांना तडीपार केले जात असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केला आहे .

यासंदर्भात शहरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली . श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांवर , राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे , हेतुपूर्वक राउडीशीटर ठरवून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.आमचे कार्यकर्ते दोन नंबरचा धंदा करीत नाहीत तर ते समाजसेवा करतात . परंतु त्यांनाच वेठीला धरले जात आहेत . अफू गांजा चरस असे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांशी पद्धतशीरपणे सेटलमेंट करून त्यांना सोडून दिले जात आहे . याचे त्यांनी नावासकट उदाहरण दिले . शिवाय श्रीराम सेनेच्या कार्यक्रमांना हेतुपूर्वक परवानगी दिली जात नाही उलट दक्षिण आमदारांच्या कार्यक्रमांना पोलीस अधिकारी उपस्थित राहतात , त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देतात , मात्र आम्हाला परवानगीसाठी इकडून तिकडे पाठवतात आणि शेवटी परवानगी देत नाही असा आरोप त्यांनी केला . असा वेगवेगळा न्याय का असा प्रश्न त्यांनी केला .

राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली ,काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे यासाठी आम्ही मोर्चा काढून जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत . २८ जानेवारी रोजी घडलेल्या गांजा जप्त प्रकरणातील आरोपीना टिळकवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी सेटलमेंट करून सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केला . यासाठी आरपीडी कॉलेज परिसर तसेच टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सत्य कळेल असे ते म्हणाले . जनतेने देखील अशा राजकारणी आणि पोलीस अधिकाऱ्याना धडा शिकवावा असे ते म्हणाले .

आमच्या संघटनेने हिंदुत्ववादी आहे , सामाजिक कार्य करीत आहे , कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांनी खूप काम केले आहे . यावेळी पत्रकारांनी रवी कोकितकर गोळीबार प्रकरणी प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या आरोपाचे , रमाकांत कोंडुसकर यांनी खंडन केले . हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे असे ते म्हणाले .

एकंदरीत श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले .

Tags: