रमेश जारकीहोळी यांनी सीडी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार महेश कुमठळ्ळी यांनी सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील रडेरट्टी गावात विविध कामांना चालना दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. महेश कुमठळ्ळी यांनी, सीडी प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवावे, त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
रमेश जारकीहोळी यांना कटात पकडण्यात आले. मी हे सुरुवातीपासून सांगत आहे. राज्यात प्रथम विषकन्या होती. त्यातच रमेश जारकीहोळी या प्रकरणात अडकल्याचे सांगत, कुमठळ्ळी यांनी रमेश जारकीहोळींसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.


Recent Comments