Belagavi

चिक्कमुनवळ्ळीत उद्यापासून महारथ लोकार्पण : श्री शिवपुत्र महास्वामी

Share

खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी गावातील नवीन भव्य महारथाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उद्यापासून 4 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री मठाचे पीठाधीश श्री शिवपुत्र महास्वामी यांनी दिली.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की, फेब्रु. 1 रोजी सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू राघवेंद्र अणवेकर यांच्या हस्ते 43 व्या युवा संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

इंचलचे डॉ. शिवानंद भारती स्वामीजी, बैलूरचे निजगुणानंद स्वामीजी, नागनूरच्या रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लम प्रभू स्वामीजी, शिरहट्टीचे श्री डिंगलेश्वर स्वामीजी आणि अनेक धर्मगुरू सहभागी होणार आहेत. फेब्रु. 3 रोजी नवीन रथाचे भव्य लोकार्पण होणार आहे. ही संकल्पना सद्गुरू सदाशिवानंद महास्वामींची होती. आता गुरूंच्या इच्छेनुसार त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अंदाजे 50 लाख रुपये खर्चून 35 फूट उंचीचा भव्य महारथ बांधण्यात आला आहे.

त्या रथावर हुबळीचे श्री सिद्धारुढ, नवलगुंदचे श्री नागलिंग स्वामी आणि आरूढ परंपरेतील इतर स्वामीजींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबी गावातील काशिनाथ बडिगेर यांनी अतिशय सुंदर रचनेत रथ बांधल्याची माहिती श्री शिवपुत्र स्वामीजींनी दिली.

या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध संगीतकार अनंत बी.एन. बनोशी, चंद्रू बेळगावी उपस्थित होते.

Tags: