बेळगावच्या ग्रामीण भागात अभूतपूर्व विकासकामे झाली असून, जवळपास सर्वच रस्त्यांचा विकास करून जनतेची सोय केली आहे असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील हिंडलगा गावात मुख्य रस्त्यापासून मध्यवर्ती कारागृहाला लागून असलेल्या चौकापर्यंत जाणाऱ्या जोड रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
या कामासाठी त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 65 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या सुविधांचा स्थानिकांनी चांगला उपयोग करून घ्यावा, असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सिद्धार्थ कृष्णा, इतर कर्मचारी, युवराज कदम, महांतेश वज्रमट्टी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments