Dharwad

स्टेअरिंग लॉक झाल्याने तीनदा उलटली कार

Share

स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे धावती कार तीन वेळा उलटली. ही घटना धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुदैवाने यात कसली जीवहानी झाली नाही.

हुबळीहून चिक्कोडीकडे जाणाऱ्या या कारचे स्टेअरिंग राष्ट्रीय महामार्गावर मुम्मीगट्टीजवळ लॉक झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार तीनवेळा उलटली. कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने ते सुखरूप बचावले. ही दुर्घटना गरग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: