जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे कामकाज संथगतीने सुरु आहे . यामुळे वाहतुकीची देखील कोंडी होत आहे . संबंधितांनी इथे होणाऱ्या समस्यांची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी वकील आणि जनतेतून केली जात आहे .
बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून , जुन्या जिल्हापंचायत कार्यालयापर्यंतचा रस्ता गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे . संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे , वकिलांसहित सर्वसामान्य जनतेला देखील खूप त्रास सहन करावा लागत आहे . ह्या रस्त्याची खोदाई एकाच वेळी करण्यात आली मात्र काम पूर्ण केलेलं नाही . हा परिसर कायमच गजबजलेला असतो . शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक ना एक आंदोलन सुरूच असते . त्यामुळे या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होते .

यासंबंधी बोलताना ऍड . मुरलीधर यांनी सांगितले कि गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे . जिल्हाधिकारी दररोज याच रस्त्याने जातात पण तरीदेखील त्यांचे याकडे लक्ष नाही . शाळा महाविद्यालये तसेच हॉस्पिटल्सना जाणार्यांना या अर्धवट रस्ता कामकाजामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली .अन्यथा बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला
तर जेष्ठ वकील ऍड . गिरीश गोकाक यांनी गेल्या पाच वर्षात भाजप सरकार कसे काम करीत आहे याचे हा रस्ता हे उदाहरण आहे . कर्नाटकाची सरकारने लूट चालवली आहे . ह्या रस्त्यावरून आमदार , खासदार , जिल्हा पालकमंत्री देखील इथून जातात मात्र ह्या रस्त्याची अवस्था पाहून देखील त्यांना हे काम लवकरात लवकर व्हावे असे वाटत नाही का असा प्रश्न त्यांनी केला . लवकरात लवकर ह्या रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली .
तर महालिंग यांनी देखील या अर्धवट रस्ता कामकाजामुळे , सार्वजनिक जनतेला त्रास होत असल्याचे सांगून , रस्त्याचे कामकाज त्वरित पूर्ण करावे असे ते म्हणाले .
एकंदर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय कम्पाउंडजवळील रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून सर्वाना सोयीस्कर करून द्यावे अशी मागणी केली जात आहे .


Recent Comments