उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये , तेराव्या जत्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली .
बेळगावमधील बॉक्साईट रोड येथील उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदिराचा तेरावा जत्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे . या निमित्ताने , मंदिरात तीन दिवस , विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत . या संबंधी माहिती देताना मंदिराच्या ट्रस्ट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि , महालक्ष्मी मंदिराच्या तेराव्या जत्रा महोत्सवानिमित्त , मंदिरात गणहोम , सुदर्शन होम , चंडिका होम, याग , जागृत चंडिका याग , ललिता सहस्त्रनाम असे कार्यक्रम पार पडले .
या निमित्ताने , मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . उषा कॉलनीसहित आसपासच्या भागातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .


Recent Comments