Belagavi

डी के शिवकुमार यांची रमेश जारकीहोळीनी केली पोलखोल

Share

राज्याचे राजकारण बिघडवण्यास डी के शिवकुमार, तसेच बेळगाव ग्रामीणच्या आमदारच जबाबदार असल्याचे सांगत , डी के शी हजारो कोटींचा मालक कसा बनला असा सवाल माजी मंत्री तसेच गोकाकचे आ . रमेश जारकीहोळी यांनी केला आहे .

सोमवारी शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना माहिती देत होते . ते म्हणाले कि , मी सहकार मंत्री असताना , डी के शिवकुमार यांनी शांतिनंगर बेंगळूर ठेवील एका सहकारी बँकेतील , दहा हजार कोटींचा बिझिनेस बंद करण्याची मागणी केली होती . पण मी ती मान्य केली नाही . राज्याच्या हितासाठी ते बंद करून जनतेची फसवणूक केली . आमच्यातील वैमनस्याला तिथूनच सुरुवात झाली . हा पैसे गेला कुठे ? बँक खाते वळवले आहे . सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी असे ते म्हणाले.

१९८५ मध्ये डी के आणि मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली . डी के शिवकुमार फाटक्या चपला घातलेल्याआणि एच एम टी घड्याळ घालून जंगली माणसासारखा येणार हा माणूस आज हजारो कोटींचा मालक होऊन , काचेच्या घरात बसला आहे हे कसे शक्य आहे असा सवाल त्यांनी केला . मात्र गरिबीतून बाहेर पडून व्यवसाय स्थापन करून पुढे आलेला मी एकमेव आहे . मी त्यांना राजकीय दृष्ट्या संपवणार या भीतीपोटी त्यांनी मला सीडी केस मध्ये धूर्तपणे गोवले . डी के शिवकुमार आणि मी १५ वर्षांपासुन मित्र आहोत . मात्र बेळगाव पी एल डी आणि ग्रामीण मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आम्हा दोघांमध्ये आगपाखड सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले

डी के शी राजकारणी झाले पण राज्याचे राजकारण , काँग्रेसचे राजकारण लयाला गेले . याला कारण डी के शिवकुमार आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार कारणीभूत आहेत असा आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला . शिवकुमार राजकारण करण्यास अयोग्य आहेत . डीके शिवकुमार म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आणि राजकारण करणारा माणूस आहे . मी वैयक्तिकरित्या कोणाचाही द्वेष करत नाही. मी कोणतीही सीडी प्रसिद्ध करणार नाही. जारकीहोळी कोणत्याही हवेत गोळीबार करत नाही.

डीके शिवकुमारने एका महिलेच्या माध्यमातून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.मी तुम्हाला शिवकुमारची ऑडिओ झलक दाखवतो. डीके शिवकुमार हे हजारो कोटींचे मालक आहेत
सीडी लेडी आणि तिला मदत करणाऱ्या सर्वांना अटक झाली पाहिजे.
डीके शिवकुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो.
त्यावेळी डीके शी यांच्या गॉडमदर उषा यांनी त्यांना काँग्रेस पक्ष न सोडण्याची विनंती केली . मात्र त्यांनी एका सीडीद्वारे माझे राजकीय जीवन उध्वस्त केले . माझ्याप्रमाणेच या भागातील दोन अधिकाऱ्यांना अश्लील सीडी नेटवर्कच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे . त्यातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे . आपल्याला ब्लॅकमेल करून त्याचा गैरवर केल्याचेही त्यांनी सांगितले .

मी फक्त कित्तूर चन्नमाबद्दल बोललो त्याचा व्हिडीओ प्रसारित करून,त्याचा उपयोग निवडणूक काळात करून घेतला गेला . भविष्यात जर कोणताही संघर्ष झाल्यास त्याला ते जबाबदार राहतील असे ते म्हणाले . हजारो कोटींचा काळा पैसे डी के शी नी जमा केला आहे त्याची सरकारने चौकशी करावी असे ते म्हणाले .
सीबीआयच्या टीमने ही सीडी टीम लवकरात लवकर उघड करावी असे ते म्हणाले.

एक ऑडिओ आहे जिथे शिवकुमारने दुबई आणि लंडनमध्ये घर असल्याबद्दल बोलले होते.
ते कदाचित त्यांच्या मैत्रिणीशी बोलले असतील . सीबीआय तपास करून डीके शिवकुमार यांना अटक करावी, असे ते म्हणाले. डीके आणि टीम, सीडी लेडी, नरेश, श्रावण, आणि मंड्यातील दोन लोकांची चौकशी व्हायला हवी . रमेश जारकीहोळी खंबीर आहेत पण त्यांनी मला संपवण्याचा कट रचला आहे. जारकीहोळी म्हणाले. सीडी लेडी डीके शिवकुमार यांनी बंगळुरूमध्ये ठेवली आहे. असा गौप्यस्फोट रमेश जारकीहोळी यांनी केला .

Tags: