Dharwad

अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन

Share

धारवाड तालुक्यातील गोवनकोप्प येथील ग्रामस्थांनी शेतात अंत्यसंस्कार करू देत नसल्याचा आरोप करत धारवाड-नवलगुंद रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केले.

शेतामध्ये मृतावर अंत्यसंस्कार करण्यास जमीन मालक सहमत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्याच्या मधोमध ठेवून रास्ता रोको करून निषेध केला.
गोवनकोप्प गावातील सहदेव बेल्लारी यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना जमीन मालकाने आपल्या जमिनीत अंत्यसंस्कार करण्यास परवानगी न दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन छेडले . जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले. एकीकडे मृतदेह रस्त्यावर अनाथासारखा ठेवण्यात आला तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनी रस्त्याच्या कडेला बसून निषेध केला.

Tags: