Chikkaballapura

विविध पक्षाच्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिक्कबळ्ळापूरमध्ये भाजप प्रवेश

Share

चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी त्यांचे भाजपचा ध्वज देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही तो एका कुटुंबाप्रमाणे आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत आहे. जनतेलाही हे माहीत होऊन चुकले आहे. त्यामुळे जनता भाजपसोबत आहे असे सांगून, पक्षात आलेल्या नेते व कार्यकर्त्यांना भाजपच्या विजयसंकल्प यात्रेत सहभागी होऊन बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी मंत्री डॉ. सुधाकर, आमदार पी राजीव, विधान परिषद सदस्य चलवादी नारायणस्वामी आदी उपस्थित होते.

Tags: