Belagavi

राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकले बेळगावचे स्केटर

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

गुरुग्राम, हरियाणा येथे नुकत्याच या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पूर्ण भारतातून 1200 च्या वर स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके अशी एकूण 3 पदके जिंकली.

स्पीड स्केटिंगमध्ये आर्य कदमने 1 रौप्य तर अवनीश कामन्नवर याने २ कांस्यपदके पटकावली. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, विशाल वेसने यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे ते सराव करत आहेत. त्यांना शाम घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे, गूड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सरला कोसराजू , उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Tags: