ग्वाल्हेरजवळ हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेले गणेशपूर, बेळगाव येथील विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्धप्पा सारथी यांचे पार्थिव आज सकाळी सांबरा विमानतळावर आणण्यात येणार आहे.
विमानतळावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सारथी यांचे पार्थिव त्यांच्या गणेशपूर येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Recent Comments