निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे बोरगाव-इचलकरंजी रस्त्याच्या कडेला असलेल्या संतोष खंडेलवाल यांच्या मालकीच्या खंडेलवाल बायो फर्टिलायझर आणि हर्बो केम इंडस्ट्रीज या कारखान्याना शनिवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खंडेलवाल बायो फर्टिलायझर आणि हर्बो केम इंडस्ट्रीज या कारखान्यात शेतीसाठी लागणारी सेंद्रिय औषधे तयार करण्यात येतात. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या कारखान्यांना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात कारखान्यातील मोठे प्लास्टिक कॅन्स, पॅकिंग बॅग, नवीन टाटा आयशर वाहन व अन्य साहित्य जळून खाक झाले. औषधे बनविण्याचे मशिन, चारचाकी वाहन मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.
अग्निशामक दलाने माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments