Belagavi

दिमाखात पार पडला धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा

Share

फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर सर्व तरुण पिढीने देशासाठी संकल्प घेण्याची गरज असल्याचे इतिहासकार , लेखक , केंद्र सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर म्हणाले .

ते धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात बोलत होते . ते म्हणाले कि , छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्त्रियांना नेहमीच आदराने वागवले . मात्र आजची आपल्या देशातील परिस्थिती बिघडली आहे . सोशल मीडिया तसेच चित्रपटांतील अश्लील दृश्यांमुळे समाजात विकृती वाढत चालली आहे . असे चित्रपट बनवणारे तसेच सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्यांना सर्वानी धडा शिकवला पाहिजे . यासाठीच आपण संस्कृती वाचवा , देश वाचवा हे अभियान सुरु केले आहे . विकृती विकून पैसे कमावणारे देशाचे शत्रू आहेत . आपल्यातील ऊर्जेचा उपयोग देशासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले .

बेळगाव उत्तरचे आ . अनिल बेनके यांनी प्रास्ताविकात सांगितले कि , संभाजी महाराजांनाच स्मारक शिव आणि शंभू भक्तांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे . बेळगावमध्ये अनेक शिवप्रेमी युवक असून , त्यांच्या सहकार्यातून , हे स्मारक उभे राहू शकल्याचे त्यांनी सांगितले .

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या , धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला . शिवप्रेमींच्या उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी छत्रपतींच्या काळात स्वाभिमानाने लढलेल्या बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम जाधव, धाराऊ यांचे वंशज अमित गाडे , हंबीरराव मोहिते याचे वंशज जयाजीराव मोहिते , यांचा मान्यवरांच्या हस्ते सातकर करण्यात आला .

यावेळी पुणे येथील शिवकन्या श्रद्धा शिंदे , तसेच लोकप्रतिनिधी , शिवशंभूंचे चाहते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .

Tags: