Belagavi

श्री राम सेना हिंदुस्थान, अनगोळ तर्फे हळदी-कुंकू

Share

श्री राम सेना हिंदुस्थान, अनगोळ तर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर , व राजहंस गल्लीचे ज्येष्ठ पंच ज्योतिबा लाटुकर, बाळू कुर्याळकर, रवी येळूरकर, करेगार यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला .

येळ्ळूर येथील वैष्णवी मंगनाईक या मुलीने स्त्रीशक्ती या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले . . यानंतर श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर सर्व महिलांना संघटित राहण्याचे आवाहन केले . त्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमात श्रीराम सेना हिंदुस्थानच्या हजारो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Tags: