Vijayapura

कौटुंबिक वादातून महिलेची तीन मुलांसह आत्महत्या

Share

कौटुंबिक वादातून एका महिलेने तिच्या तीन मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे घडली.

जालगेरी गावाजवळील विठ्ठलवाडी तांडा येथील गीता रामू चव्हाण, वय ३२ हिने आपली तीन मुले सृष्टी, वय ६, समर्थ, वय ४ आणि किशन, वय ३ यांच्यासह पाण्याच्या कुंडात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री गीताचे पतीसोबत भांडण झाले, पती रामू झोपला असताना आई गीताने तिन्ही मुलांना पाण्याच्या कुंडात फेकून दिले. नंतर तिनेही पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तिकोटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना तिकोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: