शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्यातील भाजपच्या डबल इंजिन सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांचा भाजपच खरा तारणहार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला.
बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित भाजप रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन बीएस येडियुरप्पा यांनी, उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. त्यानंतर बोलताना येडियुरप्पा म्हणाले, डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम कार्य करत आहे.

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांच्या खात्यात दरमहा केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये जमा केले जातात. त्यात राज्य सरकारकडून 4 हजार जमा करून शेतकर्यांच्या खात्यात एकूण 10,000 थेट जमा केले जात आहेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. माझ्या कारकिर्दीत राज्यात गंगा कल्याणासारख्या अनेक जनपर योजना राबविल्या. विद्यासिरीसह इतर विद्यार्थी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय नरेगा योजनेंतर्गत युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रात आणि राज्यात पर्यटनाचा चांगला विकास झाला आहे, देश आर्थिकदृष्ट्या पुढे जात आहे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर नेली आहे. माझ्या अवधीत मी पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे बजेट सादर केले. भारत हा कृषीप्रधान देश असून डबल इंजिन सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत असे येडियुरप्पा यांनी सांगितले.

भाजप रयत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुलभूत आधार आहे. आजकाल आपण अशा परिस्थितीत आहोत की आपण दूषित घटकांचे सेवन करत आहोत. देशातील शेतकऱ्यांनी शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करून उत्तम पोषणयुक्त अन्नधान्य पिकवले पाहिजे असे ते म्हणाले.
केंद्र सरकार युवा कृषी लाभार्थ्यांना पशुसंवर्धन आणि मासेमारीसाठी दीड लाख कोटींचे अनुदान देत असून त्याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. पीएम मोदींनी स्वामीनाथन यांच्या शिफारशींपैकी 98 टक्के शिफारशींवर काम पूर्ण केले आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना 5 लाखांपर्यंतच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदूंची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या राममंदिर प्रकल्पाचा जीर्णोद्धार सुरू असल्याचे ते म्हणाले. बाईट : राजकुमार चहर
यावेळी प्रदेश सरचिटणीस सीटी रवी, मंत्री शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्यासह भाजप रयत मोर्चासह पदाधिकारी, नेते, शेतकरी आदी उपस्थित होते.


Recent Comments