केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते धारवाड कृषी विद्यापीठाच्या आवारात फॉरेन्सिक कॅम्पसच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असून त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
अमित शहा काही तासांतच कृषी विद्यापीठाला भेट देणार असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एफएसएलचे संचालक धमेंद्रकुमार मीना यांनीही भेट देऊन पाहणी केली. दुपारी 12-15 च्या सुमारास अमित शहा कृषी विद्यापीठाला भेट देतील आणि भूमिपूजन केल्यानंतर ते हेलिकॉप्टरने कुंदगोळ कडे प्रयाण करतील.


Recent Comments