बेळगांव समर्थ नगर येथे श्री गृहलक्ष्मी महिला स्व सहाय्य संघ महिला मंडळ असे या महिला मंडळाचे नव्याने स्थापन करून वार्ता फलकाचे उदघाटन करण्यात आले.
वार्डाच्या नगरसेविका नेत्रावती भागवत तसेच माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्या हस्ते वार्ता फलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ नेत्रावती भागवत यांनी, महिलासाठी स्थापन केलेल्या मंडळाचे कौतुक केले. माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांनी महिलांनी स्वबळावर उभ्या रहाव्यात यासाठी असे महिला मंडळ स्थापन होणे आज फार आवश्यकता आहे असे सांगून महिला मंडळाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार मंडळाच्या अध्यक्षा विद्या तिरवीर तसेच उपाध्यक्षा रुपा बराले यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन सरिता शिंदे यांनी केले. यावेळी महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच मालिकार्जुन नगर, समर्थनगर मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments