Belagavi

न्यायालयीन वेळेची बचत आणि न्याय तत्वे जपण्यासाठी एडीआर प्रणाली एक योग्य व्यासपीठ

Share

न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि न्यायाची तत्त्वे जपण्यासाठी एडीआर प्रणाली एक योग्य व्यासपीठ आहे. असे मत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम जे एस कमल यांनी व्यक्त केले.

राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयात आयोजित , विवाद निराकरण प्रणालीवरील राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते . न्याय हा मूल्यवर्धित असला पाहिजे आणि जलद न्याय मिळायला हवा, त्यामुळे एडीएसआर प्रणाली मध्येही मोफत कायदेशीर सेवा मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि न्यायाची तत्त्वे जपण्यासाठी एडीआर प्रणाली एक योग्य व्यासपीठ आहे. असे मतही त्यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना , अनंत मंडगी म्हणाले की, नवीन वकिलांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा आणि कायदाच्या नियमाचा प्रचार करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्याचा स्पष्ट हेतू असावा.

प्रमोद कटवी, एम.आर.कुलकर्णी, एस.व्ही.गणाचारी, पी.एन.कटवी, पी.एस.साहुकार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Tags: