Belagavi

शहरात सविता महर्षी जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

Share

बेळगाव शहरामध्ये , सविता महर्षी जयंतीनिमित्त ,भव्य मिरवणूक काढण्यात आली .

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने , सविता महर्षी जयंती साजरी करण्यात आली . या निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली .

शहरातील किल्ला तलावापासून सुरु झालेल्या या मिरवणुकीचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते करण्यात आला. या मिरवणुकीत कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विध्यावर्ती बजंत्री तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Tags: