Dharwad

धारवाडमध्ये मुरुघा मठाच्या जत्रेला प्रारंभ, महारथोत्सव उत्साहात

Share

धारवाडच्या सुप्रसिद्ध मुरुघा मठाच्या पाच दिवसांच्या जत्रा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त भक्तिभावाने, भक्तांच्या जल्लोषात महारथोत्सव साजरा करण्यात आला.

धारवाड मुरुघा मठाच्या प्रांगणातून महारथोत्सवाची सुरुवात वाद्य मेळ्याच्या उपस्थितीत झाली. महारथोत्सव दुपारी मोठ्या थाटात संपन्न झाला. हुबळीच्या बृहन होसमठाचे शिवयोगी राजेंद्र महास्वामीजी, रुद्राक्षी मठाचे अल्लम्म प्रभु महास्वामीजी, उप्पिन बेटगेरी मुरू सावीर मठाचे विरूपाक्ष महास्वामीजी, गुदलीश्वर महास्वामीजी, विरक्त मठाचे सिद्धराम स्वामीजी, धारवाड मुरघा मठाचे डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांची यावेळी उपस्थिती होती. जत्रा आणि महारथोत्सवात भाग घेण्यासाठी धारवाड जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. आजपासून ५ दिवस ही जत्रा सुरु राहणार आहे.

Tags: