Belagavi

कर्ले गावात रस्ता कामाला आ. हेब्बाळकरांकडून चालना

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कर्ले गावातील स्मशानभूमीला जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी 40 लाख रु. निधी सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. आ. हेब्बाळकर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्ता कामाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, नामदेव खेमनाळकर, शंकर गोवेकर, वसंत सांबरेकर, विनायक पाटील, अमृत खेमनाळकर, स्नेहल सुतार, जयवंत पाटील, निंगाप्पा अवचारी, रामलिंग कुगजी, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

Tags: