कडोली येथील माजी सैनिक कल्याण संघाच्या वतीने प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधुन श्री विठ्ठल बिरदेव मंदिराला देणगी रुपात दिलेल्या चौकटीची मिरवणूक काढण्यात आली .
संघाचे अध्यक्ष बाबुराव बाळेकुंद्री यांच्या हस्ते चौकटीची पूजा करुन मिरवणुकीला चालना देण्यात आली .नंतर या चौकटीची गावभर ढोलवाद्यासह मिरवणुक काढून विधिवत पुजनाने चौकट उभारण्यात आदी

कडोली येथील ग्राम देवता व धनगर समाज बांधवाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिर जिर्णोद्धाराचे कार्य अंतिम टप्यात आहे . माजी सैनिक कल्याण संघ कडोली यांच्यावतीने देणगी रुपात ही चौकात देण्यात आली आहे .आम्ही देशाचे रक्षण करतो इतकेच नव्हे तर आम्हालाही सामाजिक बांधिलकी असुन गावच्या धार्मिक कार्यालाही हातभार लाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिल्याने संघाच्या या कार्याची गावासह सर्वत्र प्रशंसा व्यक्त होत आहे.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव बाळेकुंद्री यांनी माहिती दिली
यावेळी , संघाचे उपाध्यक्ष बाळाप्पा कुट्रे,सेक्रेटरी यादो कुट्रे,खजिनदार प्रकाश रुटकुटे,माजी अध्यक्ष महादेव मरगाळे व सदस्य बाबुराव पाटील,शिवाजी पाटील,यल्लाप्पा बायनाईक,वसंत राजाई,शिवाजी राजाई तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी आणि श्री विठ्ठल बिरदेव जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी, महिला व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments