गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या कागवाड तालुक्यातील जक्करट्टी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कवलगुड्ड सिद्धारूढ मठाचे अमरेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा पंचायत विभागाच्या वतीने 40 लाख रुपये खर्चून जक्करट्टी गावात बांधण्यात आलेल्या नवीन ग्राम पंचायत इमारतीचे आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आ. श्रीमंत पाटील म्हणाले की, जिल्हा पंचायत विभागाने बांधलेली पंचायत इमारत उच्च दर्जाची असून, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मी आमदार म्हणून कामाला लागल्यानंतर मतदारसंघातील सर्व जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते, शिक्षणासाठी चांगल्या इमारती, मूलभूत सुविधा देण्यास मी तयार आहे. जक्करट्टीत पंचायतीच्या इमारतीचा अभाव होता. आता ती बांधून तयार झाली असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अमरेश्वर महाराज यांनी उत्तम दर्जाची पंचायत इमारत पाहून आनंद व्यक्त केला व सर्व सदस्य, ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक मागडी, महादेव कोरे, आर. एम. पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शिद्दू खोत, उपाध्यक्षा रेश्मा कांबळे, सदस्य प्रकाश कुट्टे, रावसाहेब घोरपडे, किरण शिंदे, अच्युत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Recent Comments