हा पाच वर्षांचा चिमुरडा कन्नड आणि इंग्रजी भाषेत अस्खलित बोलून, एक लाखापर्यंतचा आकडा सांगून आणि जगातील अनेक शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी केलेले संशोधन याबद्दल तो सहज माहितीही देतो .
बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील साडेपाच वर्षांचा वेदांत कोलाजी गौडा यूकेजीचे शिक्षण घेत आहे. या लहान वयात, त्याने शाळेत , कर्नाटक राज्योत्सव या विषयावर भाषण करून प्रेक्षकांची दाद मिळाली.
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी त्याने मुचंडी गावच्या शासकीय कन्नड माध्यम शाळेत तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ इंग्रजीत भाषण केले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कर्नाटक राज्योत्सवावर त्यांनी कन्नडमध्ये भाषण करून वाहवा मिळवली.
वडील प्रकाश कोलाजी गौडा हे धारवाड उच्च न्यायालयात प्रथम श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत असून आई अश्विनी गृहिणी आहेत. आईने बी एड चे शिक्षण घेतले आहे आणि त्या वेदांतला त्या घरीच शिकवतात . आईने शिकवलेले धडे आणि भाषण आठवून तो ते अस्खलितपणे सर्वांसमोर बोलतो .
भाषणासोबतच त्याला एक लाखापर्यंतचे आकडेदेखील ओळखता आणि वाचता येतात . 40 जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी केलेले संशोधन याबद्दल देखील तो माहिती देतो . एवढ्या लहान वयात या मुलाचे भाषण ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे .
सध्या मुचंडी येथील शासकीय कन्नड शाळेत यु केजी मध्ये शिकत असून या मुलाच्या कलागुणांनी मुख्याध्यापक एस.जी. चवलगी, ग्राम पंचायत अध्यक्षा अनिता वाडियार , सिद्राय हुलकाई यांच्यासह शिक्षक व एसडीएमसी सदस्यांनी कौतुक केले.


Recent Comments