आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिला हि अबला नसून सबला आहे. ब्रिटिश काळातील इतिहासाकडे मागे वळून पाहिले तर राणी चन्नमा यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सर्वप्रथम आठवतो. काकतीत या प्रेरणा देणाऱ्या नारीशक्तीची प्रचिती येते असे प्रमुख वक्ते प्रा. मायाप्पा पाटील यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गवी फौंडेशनच्या वतीने तिळगूळ कार्यक्रम काकती येथील सिध्देश्वर मंदिराच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी सिद्दाप्पा टुमरी होल्या.
प्रमुख पाहुणे युवा नेते राहुल जारकीहोळी व मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर ग्रापं अध्यक्ष सुनिल सुणगार, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, सुरेश नाईक, भावकाण्णा टुमरी, कामाणा चौगुले,

ग्रा.पं. सदस्या सुनिता गव्हाणे, लक्ष्मी कुम्बन, प्रेमा मिरजी, विद्या सुरेकर, गीता बेळगावी, सुषमा वाटरे, सिद्दिक अंकलगी आदी उपस्थित होते.


Recent Comments