Belagavi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Share

छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो अश्लील एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून इतराना असे कृत्य करण्यास वचक बसेल अशी मागणी भाजपचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात आ . अभय पाटील यांनी बेळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसह , बेळगाव शहर पोलीस आयुक्त , डॉ . एम जी बोरलिंगय्या यांची भेट घेऊन , शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली .

यावेळी , प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ . अभय पाटील यांनी सांगितले कि , शिवाजी महाराजांचा फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून पोस्ट करण्यात आला आहे .सोशल मीडियावर अश्लील पद्धतीने फोटो एडिट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे . ही गंभीर बाब असून , यामुळे समाजाची शांती भंग होऊ शकते . याची दखल घेऊन, बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन दिले. धर्मांधांना शहाणपण शिकवायचे असेल तर उत्तर प्रदेश मॉडेलनुसार दोषींची मालमत्ता जप्त केली पाहिजे. देवी-देवतांच्या प्रतिमांची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आ . अभय पाटील यांनी केली आहे.

शहर पोलीस आयुक्त डॉ.बोरलिंगय्या यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.
शिवाजी महाराजांचा एक अश्लील एडिट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आरएक्स इम्रान, किंग की जान , इस्लाम जिंदाबाद नावाच्या आयडीवर ही पोस्ट टाकण्यात आली आहे
बेळगावात या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .

Tags: