Belagavi

आ. अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची सांगता

Share

आ .अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची सांगता शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच महिलांच्या फॅशन शो कार्यक्रमाने करण्यात आली . हजारो बेळगावकरांच्या उपस्थितीत आकाशात फटाक्यांची आतषबाजी करून हा आंतरराष्ट्रीय पंतग महोत्सव दिमाखात पार पडला .

 

21 जानेवारीपासून , आ . अभय पाटील आयोजित या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली होती . सलग चार दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल होती . या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी , शरीर सौष्ठव स्पर्धा 3 विभागात घेण्यात आल्या. बेळगाव मधील विविध जिम मधील जवळपास 50 तरुणांनी या स्पर्धेत भाग घेतला . आणि आपल्या पिळदार शरीराचे प्रदर्शन केले . यावेळी विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली .

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे तसेच पंच म्हणून , मिस्टर इंडिया आनंद आपटेकर उपस्थित होते . यावेळी बोलताना त्यांनी आ . अभय पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून फक्त विकासावरच न थांबता , त्याबरोबरच जनतेच्या मनोरंजनासाठी तसेच खेळांना प्राधान्य देत आहेत . त्यांनी आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात प्रथमच , शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो . असे व्यासपीठ कुठेच मिळत नाही . पण आ . अभय पाटील यांनी ते उपलब्ध करून दिलीये आहे . यामुळे अनेक तरुणांना प्रोत्साहन मिळाले . अशा स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्यात असे आवाहन त्यांनी केली .

यावेळी बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे तसेच विविध संघटनानी आ . अभय पाटील यांचा सत्कार केला . यावेळी आ . अभय पाटील यांनी , बेळगाव मध्ये आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला भरघोस प्रतिसाद लाभल्याचे सांगितले . 4 दिवस विविध कार्यक्रमांना लोकांनी प्रचंड उपस्थिती लावली . असे कार्यक्रम पुढेही आयोजित करू . त्याचप्रमाणे , बॉडी बिल्डिंग असोसिएशनसाठी कार्यकम स्वरूपी जागा देण्यासाठी , बुडाच्या बैठकीत विषय मांडून निर्णय घेऊ असे सांगितले .

याच कार्यक्रमात महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये महिला तसेच तरुणींनी विविध थीम वर कॅटवॉक केले . बॉलिवूड वेस्टर्न आणि विविध प्रकारच्या संकल्पनांचा माध्यमातून आकर्षक आणि उठावदार प्रदर्शन करून , या फॅशन शोची रंगत वाढवली . वैयक्तिक तसेच सामूहिक गटामध्ये झालेल्या या फॅशन शो मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा खूप मोठा सहभाग होता . फॅशन डिझायनर नवनीत पाटील यांनी या फॅशन शो चे निर्णायक म्हणून काम पाहिले .

त्यानंतर विजयकांत सिदनाळ यांनी या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या सांगता समारंभातील क्रॅकर शो चे रिमोटद्वारे उदघाटन केले . आणि काही क्षणात आकाशात रंगबिरंगी फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली . यामुळे दिवाळी सणाचे वातावरण निर्माण झाले होते . आकाशातील फटाक्यांची रोषणाई पाहायला मालिनी सिटीचे मैदान खचाखच भरले होते .

एकंदरीत आ . अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०२३ ची सांगता फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आली . गेले चार दिवस हजारो बेळगाववासीयांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला .

Tags: