कडोली येथील सरकारी मराठी,कन्नड व उर्दू शाळेच्या मुलांचा शाळेतर्फे क्लस्टर लेवल शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .

या क्लस्टर स्तरीय कार्यक्रमात , अकरा शाळा सहभागी झाल्या होत्या . प्रारंभी कित्तुर चन्नमा संगोळ्ळी रायाण्णा,शिवाजी महाराज,बाबा साहेब आंबेडकर , ,महात्मा,फुले,वीर जवान ,शेतकरी, तसेच अनेक राष्ट्रपुरुषांच्या विविध वेशभूषा केलेली मुले, पालखी उत्सव,भजन , त्याचप्रमाणे , जलकुंभ घेऊन विद्यार्थ्यांची गावात वाद्यघोषात अत्यंत आकर्षक मिरवणूक काढण्यात आली .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी तालुका रयत संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
त्याचप्रमाणे जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबरच अशा कार्यक्रमातून सहभागी व्हावे आणि आपली कलाप्रतिभा विकसित करावी असे सांगितले )
यानंतर विद्यार्थिनींनी आकर्षक अशी नृत्ये सादर केली .
यावेळी , गजानन कागणीकर ,ग्रा.पं.उपाध्यक्षा रेखा नरोटी,माजी ग्रा.पं.उपाध्यक्षा प्रेमा नरोटी,ग्रा.पं.सदस्य सिद्धु शहापुकर, एसडीएम सी अध्यक्ष रामचंद्र हित्तलमनी, नोडल अधिकारी म्हणुन सरकारी कन्नड हायस्कुलच्या मुख्याध्यापिका यु.पि हिरेमठ, क्लस्टर सिआरपि एस.एच.कृष्णोजी,मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.शिंदे, कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या कानपेठसह यांसह अकराही शाळांचे मुख्याध्यापक , एसडीएमसी सदस्य आदी मान्यवर होते.
Recent Comments