Belagavi

शिमोग्यातील स्पर्धेत चमकले बेळगावचे तरुण तुर्क ! पटकावली 8 पदके

Share

नेहरू स्टेडियम, शिमोगा येथे झालेल्या चौथ्या कर्नाटक मास्टर्स गेम वयस्कर खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये बेळगावच्या वयस्कर धावपटूंनी पटकावली 8 पदके पटकावली आहेत. 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके त्यांनी पटकावली आहेत.

या स्पर्धेत हिंडलगा, बेळगाव येथील धोंडीराम शिंदे यांनी 75 वर्षांवरील गटात 100 मीटर धावणे प्रकारात रौप्य पदक, 10 किमी धावणे प्रकारात रौप्य पदक आणि 200 मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

उचगाव येथील सुरेश देवरमणी यांनी 70 वर्षांवरील गटात 10 किमी धावणे प्रकारात सुवर्ण पदक, 5 किमी धावणे प्रकारात सुवर्ण पदक, 5 किमी चालणे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.

सुळगे (हिंडलगा) येथील मारुती कणबरकर यांनी 75 वर्षांवरील गटात भालाफेकमध्ये सुवर्ण पदक आणि 5 किमी चालणे प्रकारात रौप्य पदक पटकावले. याबद्दल त्यांचा नेहरू स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. हे तिघेही बेळगाव तालुक्यातील वयस्कर धावपटू असून, या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: