Belagavi

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घाला : हिंदू जन जागरण समिती

Share

प्रजासत्ताक दिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घेण्याची मागणी हिंदू जन जागरण समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज डौलाने फडकवण्यात येतो. त्यावेळी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, तिरंगी बॅजेस, मास्क वापरण्यात येतात. संध्याकाळी मात्र ते गटारीत, रस्त्याच्या कडेला टाकण्यात येतात. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन हिंदू जन जागरण समितीतर्फे बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी माहिती देताना समितीच्या उज्ज्वला गावडे यांनी सांगितले की, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, तिरंगी बॅजेस, मास्क वापरून टाकून देणे हा त्यांचा अवमान आहे. हिंदू जन जागरण समितीने यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून बंदीची मागणी केली होती. त्यावर सुनावणी घेऊन हायकोर्टाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. तरीही त्याची पायमल्ली केली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी हिंदू जन जागरण समितीचे मधुकर होनगेकर, सुधीर हेरेकर, सदानंद मासेकर, काशिनाथ शेट्टी, आक्काताई सुतार, मिलन पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: