खानापूर तालुक्यातील आमटे येथे बांधण्यात आलेल्या कित्तूर राणी चन्नमा निवासी शाळेच्या इमारतीच्या उदघाटनाच्या आमंत्रण पत्रिका वितरित केल्यानंतर अचानकपणे हा उदघाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने , अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत .
खानापूर तालुक्यातील आमटे येथे , कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळेची इमारत बांधण्यात आली आहे . इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या सुमारे 250 विद्यार्थिनींची निवासाची आणि शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे .
बेळगाव जिल्हा प्रशासन , जिल्हा पंचायत , बेळगाव समाज कल्याण विभाग, बेळगाव आणि कर्नाटक निवासी शिक्षण संस्थांचा संघ बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने , बुधवार दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता या इमारतीचे उदघाटन होणार होते . या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका देखील वितरित करण्यात आल्या होत्या . मात्र सदरचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला . यामुळे काँग्रेस नेत्यांसह जनमानसातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत .
जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाने याचे उत्तर द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे भाजप सरकारला मुलींच्या शिक्षणाची काळजी नाही का ? त्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान असेच आहे का ? यामागे भाजपचे क्षुद्र राजकारण असल्याचा आरोप देखील केला जात आहे . यामागे भाजप नेत्यांचा अहंकार आहे कि ज्यांना खानपूरच्या जनतेची काळजी नाही . या आधी बसस्थानकाच्या भूमी पूजन कार्यक्रमावेदेखील हाच प्रकार घडला होता पण जनतेच्या सहकार्याने त्यावेळी हा कार्यक्रम पार पडला होता .
भाजप सरकार मुलींच्या शिक्षणासाठी , भविष्यासाठी अनेक योजना राबवत आहे . मग खानापूरमधील , आमटे येथे बांधलेला मुलींच्या निवासी शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन , आमंत्रण पत्रिका वाटून झाल्यावर रद्द करण्यात का आले ? असा प्रश्न काँग्रेसच्या आमदारांसह , स्थानिक जनतेमधून उपस्थित i केला जात आहे . संबंधित विभाग तसेच व्यक्तींनी हीन दर्जाचे राजकारण न करता मुलींच्या शिक्षणावर भर देऊन इमारतीचे उदघाटन लवकरात लवकर करावे अशी मागणी जोर धरत आहे .
Recent Comments