विजापूर तालुक्यातील अरकेरी गावात मंदिरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून हल्लेखोर फरार झाल्याची घटना घडलीआहे .
55 वर्षीय परसप्पा गुंडकर या व्यक्तीचा खून झाला आहे . तो बसवनबागेबाडी तालुक्यातील कमनकेरी येथील रहिवासी आहे.
काही दिवसांपासून मंदिरात तो काही किरकोळ कामे करीत होता . त्याचा निर्घृण खून करून मारेकरी पळून गेले आहेत .
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Recent Comments