कर्तृत्वासाठी लिंगभेद नसतो. जिद्द असेल तर महिला समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात,
अशी तुमच्यासह लाखो उदाहरणे आहेत. महिलांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य देण्यास कटिबद्ध असल्याचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
मतदारसंघांतर्गत मंडोळी गावात नवीन रणरागिणी महिला मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
गावातील महिलांनी संघटित होऊन महिला मंडळ स्थापन केले याचा आनंद आहे. या महिला मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी विधायक उपक्रम राबवावेत, अशी इच्छा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात दीपा दशरथ साळवी, शालिनी परुशराम कणबरकर, शोभा शिवाजी पाटील, सरस्वती दत्ता साळवी व महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments