Belagavi

सिद्धरामय्या कोलारमधून निवडणूक लढवणार नाहीत : बीएसवाय यांचा नवा बॉम्ब

Share

विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोलारमधून निवडणूक लढवणार नाहीत असा नवा बॉम्बस्फोट माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेळगावमध्ये केलाय.

बेळगावात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, कोलारमध्ये काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेबाबत प्रतिक्रिया दिली.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, मी भविष्य सांगत नाही. परंतु सिद्धरामय्या कोलारमधून कोणत्याही कारणास्तव निवडणूक लढवणार नाहीत. ते कोलारला थांबणार नाहीत, असा अंदाज आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर ते नाटक रचत आहेत, म्हैसूर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोलारमधून लढले तर नक्कीच घरी जातील. मात्र, सिद्धरामय्या केवळ राजकीय गाजावाजा आणि नाटक करत आहेत.

माझ्या मते, ते कोलार येथे थांबणार नाहीत, ते म्हैसूरला जाऊ शकतात. सिद्धरामय्या दोन बाजूंनी किंवा तीन बाजूंनी लढले तरी ते नक्कीच घरी जातील, असा विनोद येडियुरप्पा यांनी केला.

Tags: