रामदुर्ग तालुक्यातील मनिहाळ गावात 27 बकऱ्यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.

रामदुर्ग पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मनिहाळ गावात 27 बकऱ्यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चिलमूर गावचे मेंढपाळ विठ्ठल लक्काप्पा सनदी यांनी रामदुर्ग तालुक्यातील मनिहाळ गावातील शेकरय्या बुदिहाळ यांच्या शेतात सुमारे 100 मेंढ्यांचा कळप बसविला होता. त्यापैकी 27 मेंढ्यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला आहे.
त्यामुळे मेंढपाळ सनदी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मेंढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पशु वैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालानंतरच मेंढ्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे.
या प्रकरणी रामदुर्ग पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments