बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या उभारणीच्या कामाचा आणि किल्ल्याच्या आत व बाहेर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, ज्येष्ठ व कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्घाटनाची तारीख लवकरात लवकर निश्चित केली जाईल असे यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी गावातील ज्येष्ठ नेते युवराज कदम, मनोहर बेळगावकर, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, सातेरी बेळवटकर, छत्रे, भाऊराव पवार, पद्मराज पाटील, भागण्णा नरोटी, सचिन सामजी, महावीर पाटील, गणपत मारिहाळकर, प्रभाकर आदी उपस्थित होते.


Recent Comments