Belagavi

विजयनगर येथे 60 फुटी रस्ता कामाला प्रारंभ

Share

हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील विजयनगर येथे आमदार निधीतून 60 फुटी रस्ता काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी काही रहिवासी आणि ग्रापं सदस्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर बुडा आयुक्तांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची समजूत घातल्यावर कामाला प्रारंभ करण्यात आला.

आमदार निधीतून विजयनगर येथे 60 फुटी रस्ता काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला. साईनंदन रेसिडेन्सीपर्यंत खुला असलेला हा रस्ता वर अडवण्यात आला होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत होता. ग्रापं सदस्य प्रवीण पाटील, गजानन बांदेकर, राहुल उरणकर, विठ्ठल देसाई, रामचंद्र कुद्रेमनीकर, डी. बी. पाटील, दीपा निलजकर, चेतना अगसगेकर आदींनी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केल्यामुळे कामात अडथळा येत होता. त्यामुळे बुडा अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन मागणी मांडण्यात आली.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व स्वराज्य कॉलनीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. काही रहिवाशांनी वाद घातल्याने कॅम्प पोलिसांना बोलावून घेण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर रस्ताकामाला पुन्हा चालना देण्यात आली.

यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वर्षानंतर रस्ताकामाला चालना मिळाल्याने बहुतांश नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.

Tags: